बापरे…लसणाचे भाव भिडले गगनाला, तब्बल ४०० रुपये किलो

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अन्न, वस्त्र आणि निवारया गोष्टींना आपल्या दैनंदिन जीवनात भरपूर महत्व आहे. पण सर्वात महत्वाचे म्हणजे अन्नामध्ये कांडा आणि लसूण, हे देखील महत्वपूर्ण मानले जाते. कांदा किंवा लसूण खाद्यपदार्थात नसले तर अनेकांच्या जिभेची चव जाते. प्रत्येक घराघरात, हॉटेलमध्ये कांदा आणि लसूण असणार नाही असं अपवादात्मक परिस्थितीत बघायला मिळेल. पण कांदा आणि लसूण यांच्याबाबत समोर आलेल्या एका बातमीमुळे सर्वसामान्य नागरिकाचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कांद्याने आत्तापर्यंत सर्वसामान्यांना भाववाढीतून चांगलंच रडवले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला वर्ग, नाराजी व्यक्त करत आहे.

का वाढले लसणाचे दर ?
कांद्यापाठोपाठ आता लसूण सुद्धा महागला आहे. प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका पिकांवर पडल्याने पिकांच्या खराब झालेल्या उद्पादनामुळे लसणाच्या दारात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यापासून २०० ते २५० रुपये किलो असलेला लसूण आता ३५० ते ४०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दादर बाजारपेठेत लसणाचे दर वाढल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

अनेक हॉटेल आणि घरांमध्ये लसणाची चटणी आणि लसणाचे पदार्थ मेनूमधून काढून टाकण्यात येत आहेत. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवीन पीक बाजारात येण्यास वेळ लागेल आणि तोपर्यंत भाव चढेच राहण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.