लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडली कोट्यावधीची मालमत्ता

0

सोलापूर – जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार  यांच्याकडे भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किंमतीची अपसंपदा आढळून आली आहे. यानंतर किरण लोहारसह त्यांची पत्नी, मुलावरही सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात बुधवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लाचलुपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी फिर्याद दिली आहे.

तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार, पत्नी सुजाता किरण लोहार, मुलगा निखिल किरण लोहार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, लोहार यांनी परिक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक ५ कोटी ८५ लाख ८५ हजार ६२६ रुपयांची अपसंपदा जमविली आहे. त्यांची पत्नी सुजाता लोहार व मुलगा निखिल लोहार यांनी किरण लोहार यांना सहाय्य केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाला आहे.

लाचखोर किरण लोहार यांनी आजवर शिक्षण खात्यात केलेल्या ‘पराक्रमाचा’ आता हळूहळू उलघडा होत आहे. त्यांनी आजवर मिळवलेल्या मायेचा विचार केल्यास सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. किरण लोहार यांनी गेल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात ५० कोटींपेक्षा अधिकची संपत्ती जमवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोलापूर प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना २५ हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.