शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 31 मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या क्रीडा खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

शासनाने शिवछत्रपती पुरस्कारासाठी नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2019-20, 2020-21, व 2021-22 या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील खेळाडू (ज्या खेळाच्या फेडरेशन कप स्पर्धा होतात असे सहभागी/प्राविण्यप्राप्त खेळाडू फक्त) यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा विहीत नमूना https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन डाउनलोड करून घ्यावा. व्यवस्थितरित्या भरून संबंधित जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सदर करावा.

शिवछत्रपती राज्य पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 31 मार्च, 2023 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या बातम्या मधील लिंकवर पहावे. पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्या-या खेळाडूंनी विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.