माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची पुन्हा धाड

0

कोल्हापूर , लोकशाही न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर पुन्हा एकदा ईडीची (ED) धाड पडली आहे. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हसन मुश्रीफ यांच्या कागलच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी पुन्हा दाखल झाले आहेत. सलग तिसऱ्यांदा ईडीकडून ही छापेमारी सुरु आहे. पाच गाड्यांमधून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी दाखल झाले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ दोन महिन्यात तिसऱ्यांदा ईडीच्या रडारवर आले आहेत. दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

साखर कारखान्याशी संबंधित ईडीकडून कोल्हापूर आणि पुण्यात सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिलं होतं. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या कथित 40 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी हसन मुश्रीफांची ईडीकडून चौकशी सुरु आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.