Sunday, May 29, 2022

धारदार हत्यारे हाती घेऊन भुये आणि भुयेवाडीत ६ लाखांचा ऐवज लुटला

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

कोल्हापूर 

- Advertisement -

शिरोली : सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दोन्ही गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे.धारदार हत्यारे हाती घेऊन चोरट्यांनी सोमवारी रात्री साडेदहा ते पावणे तीनच्या दरम्यान भुये आणि भुयेवाडी या गावात धुमाकूळ घातला. या दोन्ही गावांत दरोडा टाकून सव्वा सहा लाखांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड दरोडेखोरांनी लुटली. तोंडाला रुमाल बांधून, अंगात शर्ट न घालता हाफ पँटवर हे चोरटे भुये व भुयेवाडी परिसरात फिरतानाचे फुटेज सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

हे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दोन्ही गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी भुये येथील नायकू पांडूरंग निरुखे यांच्या फिर्यादीवरून शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात, तर भुयेवाडी येथील प्रिया अजित पाटील यांच्या फिर्यादीवरून करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : भुये येथील नायकू निरुखे हे झोपले होते. सोमवारी रात्री साडेदहा ते पावणे तीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी कटावणीच्या साह्याने काढून घरामध्ये प्रवेश केला.

घरातील तिजोरीचा दरवाजा उघडून तिजोरीतील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ५ लाख ३९ हजारांचा ऐवज चोरून नेला. यामध्ये वेल, झुमके, नेकलेस, तीन अंगठ्या, घंटण, चेन, रिंगा, टॉप्स, लक्ष्मीहार असे सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण व रोख ९८ हजार रुपये असा मुद्देमाल चोरला. व तिजोरीतील साहित्य विस्कटले.

तर भुयेवाडी येथे सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमाराला तीन अज्ञात चोरट्यांनी घराच्या पत्राशेड जवळील रिकाम्या जागेतून घरामध्ये प्रवेश केला. या आवाजाने अजित पाटील व त्यांच्या पत्नी प्रिया दोघेही जागे झाले. पण चोरट्यांनी अजित पाटील व प्रिया पाटील यांना मारहाण करण्याची धमकी दिली.

प्रिया यांच्या गळ्यातील सुमारे पावणे दोन तोळ्याचे सोन्याचे अंदाजे ८१ हजार रुपयांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. याबाबत प्रिया पाटील यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, चोरटे परप्रांतीय किंवा फासेपारधी असावेत, असा ग्रामस्थांचा संशय आहे. ते धारदार हत्यारे घेऊन फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या