भाजपच्या पदाधिकाऱ्यावर कोयता हल्ला

झटापटीत हाताचा अंगठा तुटला!

0

 

पुणे,

 

पुण्यातील गुन्हेगारी इतकी वाढली आहे की दरदिवशी गुन्हेगारीच्या चित्रविचित्र घटना समोर येत आहेत. त्यामुळे लोकांना पुणे पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल सातत्याने उपस्थित होत आहे. कधी हाणामारी, कधी गोळीबार, कधी खून तर कधी कोयता गँगची दहशत यामुळे पुणे पार हादरुन गेले आहे. यातच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये काही तरुणांनी थेट भाजपा युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला असून या झटापटीत पदाधिकाऱ्याच्या हाताचा अंगठा तुटला आहे. तो जखमी झाला असून सध्या त्याला उपचारांकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

प्राप्त माहितीनुसार, पुणे शहरातील लोहियानगर परिसरात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाला. अक्षय दत्ता ढावरे (रा. लोहियानगर, गंज पेठ) असे जखमी झालेल्या भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. अक्षय ढावरे हे कसबा मतदारसंघाचे भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत. याबाबत अक्षयचे भाऊ नागेश ढावरे याने फिर्याद दिली आहे.

रात्री सुमारास अक्षय आणि त्यांचे मित्र हे शंकरशेठ रस्ता परिसरातील एका हॉटेवर चहा पित बसले होते. त्यावेळी आरोपी दुचाकींवरून तिथे आले. ‘लोहियानगरमें मसीहा बन रहा है, आज इसको मारने का’ असे म्हणून आरोपींनी अक्षय यांना जातीवाचक शिवीगाळ केली. इतकेच नाही, तर आरोपींनी अक्षय यांच्यावर कोयत्याने सपासप वार देखील केली. या घटनेत अक्षय यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

   कोयत्याचा वार रोखत असताना अक्षय यांच्या हाताचा अंगठा तुटला. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले होते. परिसरातील नागरिकांनी अक्षय यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी खडक पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेचा तपास पोलिस आयुक्त मच्छिंद्र खाडे करीत आहेत.

हे आहेत आरोपी

खडक पोलिसांनी आठ ते नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. सलमान उर्फ बल्ली नासीर शेख (वय 31), युसुफ उर्फ अतुल फिरोज खान (वय 24), सुलतान चाँद शेख (वय 26), असिफ उर्फ मेंढा इक्बाल सय्यद (वय 36, तिघेही रा. लोहीयानगर) आणि असलम पटेल अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.