शिंदे कुटुंबीयांनी बाजार समीतीला लुटण्याचे काम केले; आमदार किशोर पाटील

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

भडगाव बाजार समीतीच्या निवडणुकीत शिवसेनेची ख-या भाजप आणि राष्ट्रवादि काँग्रेस सोबत युती असून निवडणुकीत सर्व्हेच्या सर्व जागांवर विजय मिळवू , असा विश्वास आ.कीशोर पाटील (Kishore Patil) यांनी व्यक्त केला. ते भडगाव येथे शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विकास पाटील, सुनील पाटील, युवराज पाटील, डाॅ.विलास पाटील, युवासेनेचे लखीचंद पाटील, शहरप्रमुख अजय चौधरी, माजी उपसभापती विश्वास पाटील, ई उपस्थित होते. आमदार पाटील पुढे म्हणाले की, मतदार संघातील सहकार अर्थात सहकारी संस्था वाचविण्यासाठी सर्वानी एकत्रित येण्याचे मी व माजी आ.दिलीप वाघ यांनी आवाहन केले होते. त्या आवाहनाला साद देत खरी भाजप ने आमच्यांशी एकत्रित निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली. त्यातुन सकारात्मक चर्चा झाली. तर राष्ट्रवादि काँग्रेसने ही आमच्यासोबत एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. काहींनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी याकडे दुर्लक्ष केले. मतदार ही बाजार समीतीच्या हीतासाठी त्याच्यांकडे दुर्लक्ष केल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास मला असल्याचे आमदारांनी सांगीतले.

आम्ही विकास केला तर त्यांनी लुटल!
आ. कीशोर पाटील पुढे म्हणाले की, बाजार समिती जोपर्यंत आमच्या ताब्यात होती. तेव्हा आम्ही शेतकऱ्याचे हीत जोपासत बाजार समीतीचा विकास केला. भडगाव, वरखेडी, कजगाव व नगरदेवळा उपबाजाराचे बांधकाम केले. आज भडगावात अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आम्ही नेहमी बाजार समीतीच्या पर्यायाने शेतकऱ्यांचे हीत जोपासले. मात्र विरोधकांनी विषेशत: शिंदे कुटुंबीयानी बाजार समीतीला लुटण्याचे काम केले आहे. त्यांनी सुरवातीला पाचोरा बाजार समतीची ५० हजार स्क्वेअर फुट जागा विकली ती ही स्वत: घेतली. त्यानंतर उर्वरीत ६० हजार स्क्वेअर फुट जागेची कींमत बाजार भावाप्रमाणे १० कोटी होती. मात्र त्यांनी त्या जागेचे मुल्यांकन अवघे सव्वा चार कोटी दाखवले. मात्र मतदार सुज्ञ आहे, त्यांचा हा कुटील डाव साध्य होऊ देणार नाही. सर्वच्या सर्व १८ जागांवर आणचेच उमेदवार निवडून येतील. पाचोरा-भडगाव तालुक्यात झालेल्या मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद हे त्याचे द्योतक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.