माझे हातपाय तोडण्याचे होते आदेश- किरीट सोमय्या

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेत शिवसैनिकांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर राजकीय वाद चांगला पेटला आहे. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून आता कारवाईची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले आठ शिवसैनिक मंगळवारी स्वतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शनिवारी पुणे महानगरपालिकेत किरीट सोमय्या शनिवारी आले असताना शिवसैनिक निवेदन देण्यासाठी पुढे आले, यातूनच झालेल्या धक्काबुक्कीत व राड्यामध्ये सोमय्या पायऱ्यांवर पडले. याप्रकरणी सोमय्या यांनी सेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह आठ जणांविरुद्ध दिली तक्रार दिली आहे. सोमय्या यांच्या तक्रारीनुसार संजय मोरे, किरण साळी यांच्यासह आठ जणांवर शिवाजीनगर पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला आहे.

हातपाय तोडण्याचे होते आदेश – सोमय्याचा आरोप

महानगरपालिकेत शिवसेने केलेल्या धक्काबुक्कीत फारशी शारीरिक इजा झाली नाही. पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी व शिवसेना हायकमांडने मिळून रीतसर कट रचत ही मारहाण केल्याचं समोर आले आहे. यामध्ये किरीट सोमय्या दोन, तीन महिने उठला नाही पाहिजे असा मार देण्याचा कट होता,” असा दावा किरीट सोमय्या यांनी आहे. अमिताभ गुप्ता हे तेच पोलीस आयुक्त आहेत. ज्यांनी राकेश वाधवानला पळवून लावलं होतं. सगळे व्हिडीओ पाहिल्यानंतर आणि सीआयएसएफच्या अहवालतही पुणे पोलीस, महापालिकेतील सुरक्षा कर्मचारी आणि शिवसेना हायकमांडने मिळून रितसर कट रचला असल्याचं समोर आलं असल्याचेही त्यांनी या म्हटलं आहे.

गृहसचिवांना पत्र
याबाबत मी पालिका आणि पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. गृहसचिवांना पत्र लिहिलं आहे. राज्यपालांची भेट घेणार आहे, कारवाईची मागणी करणार आहे. स्थानिक पोलीस अधिकारी, पालिकेचा सुरक्षा प्रमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्री कार्यालयाने जाब दिला पाहिजे,” असंही ते सोमय्या म्हणाले आहेत . या घटनेशी संलग्न व्हिडिओही त्यांनी ट्विट कर शिवसेनेचा हेतू मला मारण्याचा असल्याचे म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.