Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण संपन्न
    जळगाव

    खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण संपन्न

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 26, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयाच्या जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील कोषाध्यक्ष डी.टी.पाटील, सचिव ॲड. सिताराम फालक, व्यवस्थापन सदस्य ॲड. प्रमोद पाटील, हरीश मिलवानी, प्रा. चारुदत्त गोखले, सुधीर बेंडाळे, डॉ. हर्षवर्धन जावळे, डॉ. मीनाक्षी वायकोळे, लक्ष्मीकांत चौबे, श्रीकांत मनियार, प्राध्यापक संजय भारंबे, मंगेश झोपे हे मंचावर उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी दिवंगत सदस्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संस्थेतील विविध शाखा मधील प्राध्यापक कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. यात डॉ. भूपेंद्र केसुर, रवींद्र पाटील, डॉ. जयश्री भिरूड, डॉ. मनोज पांडे, डॉ. आर आर महिरे, डॉ. वसीम आर शेख, डॉ. गुलाब तडवी, डॉ. राजीव पवार, डॉ. कविता पाटील, डॉ. प्रतिभा निकम, डॉ. चंद्रमणी लभाणे, डॉ. बालाजी राऊत, डॉ. संगीता चंद्रात्रे, डॉ. नयना फिरके, प्रा. अभिजीत पाटील, प्रा. दिपाली किरंगे, प्रा. तनुजा फेगडे, प्रा. धनपाल वाघुळदे, प्रा. स्वप्निल काटे, प्रा. रवींद्र पाटील पीजी महाविद्यालय, प्रा. स्नेहल देशमुख, डॉ. संजय कुमावत, सुषमा कंची, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, रणजीत पाटील, देवेंद्र चौधरी, प्रा.संजय सुगंधी, संजय दहाड, डॉ. शिल्पा बेंडाळे यांचा सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमात सुषमा कंची, प्रा. संजय पावडे, डी.टी.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी पुढील पाच वर्षातील व्हिजन सर्वांसमोर मांडले. यात केसीई सोसायटीच्या विविध मान्यता प्राप्त शाखा यांच्यात समन्वय घडवून विद्यार्थी हितासाठी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अभिनव उपक्रम राबवून तसेच नॉलेज बेस, स्किल बेस्ट एज्युकेशन पॉलिसी आपण राबवणार असल्याचे भाकीत केले आणि लवकरच क्लस्टर विद्यापीठ आपण होवू असे सुतवाच केले.  यासोबतच आगामी काळात सप्तकलादालन, समुदाय रेडिओ आणि अद्यावत असा ऑडिओ- व्हिडिओ स्टुडिओ, भव्य असा ऑडिटोरियम आपण साकारणार असल्याची देखील त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार ॲड. प्रमोद पाटील यांनी मानले.

    Annual General Meeting Educational News jalgaon Khandesh College Education Society
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif