Saturday, January 28, 2023

“त्यांना फळे भोगावीच लागणार”; गिरीश महाजनांची ठाकरेंवर टीका

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जामनेर (Jamner) येथे आयोजित कार्यक्रमादरम्‍यान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बोलत होते.

आमच्‍या सोबत राहून निवडून आले. परंतु आमच्या पाठीत शिवसेनेने (Shivsena) खंजीर खुपसला. आमच्याशी गद्दारी करुन राष्ट्रवादी (NCP), काँग्रेसला (Congress) जाऊन मिळाले. मात्र याचे फळ शिवसेनेला भोगावे लागत आहे. त्यांचे 50 पैकी चाळीस आमदार व 18 पैकी 12 खासदार गेले. आता त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलेले नाही. अडीच वर्षांचा आमचा काळ फुकट गेल्‍याचे देखील महाजन यांनी सांगितले.

- Advertisement -

फळे भोगावीच लागणार 

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आमच्‍या सोबत राहून निवडून आले. परंतु आमच्या पाठीत शिवसेनेने खंजीर खुपसला. आमच्याशी गद्दारी करुन राष्ट्रवादी, काँग्रेसला जाऊन मिळाले. आमच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरेंची शिवसेना फितूर झाली. त्यामुळे ठाकरेंनी जे केलं आहे त्याची फळ त्यांना भोगावीच लागणार आहेत, असा इशारा महाजन यांनी दिला.

शिवसेना भवनासाठी मारामाऱ्या 

आमदार, खासदार फुटल्‍यानंतर मोठा उठाव झाला. शिवसेना कोणाची यावर प्रश्‍नचिन्‍ह उभे राहून नावासाठी, चिन्हासाठी भांडले, आत ते मैदानासाठी भांडत होते. तर काही दिवसांनी शिवसेना भवनासाठी मारामाऱ्या करतील अशी बोचरी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

तसेच महाजन म्हणाले की, शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर पक्षात उभी फूट पडली. त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) काही आमदार, खासदार आणि नगरसेवकांनी बंड करत खरी शिवसेना आमची असल्याचा दावा केला. पक्षातील गटनेते पदासोबतच पक्ष, पक्षाच्‍या चिन्हावरही शिंदे गटाने दावा केला. या संघर्षासंदर्भातील प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे