केमिस्ट्र अँड ड्रगिस्ट संघटनेची 38 वी वार्षिक आमसभा संपन्न

केमिस्ट्र बांधवांनी आधुनिक बदल स्वीकारून प्रगती करा, १२०० केमिस्ट बांधवाना संबोधन

0

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

एकविसाव्या शतकाच्या या आधुनिक युगात आपण सर्वजण वावरत असताना औषधी क्षेत्रात नवनविन बदल घडत आहेत. या होणाऱ्या बदलांचा स्वीकार करून तसेच औषधी क्षेत्रातील परिपूर्ण अभ्यास व ज्ञान अधिग्रहित करून चांगल्या दर्जाची रुग्णसेवा द्यावी व या सेवेच्या माध्यमातून केमिस्ट बांधवांनी आपल्या व्यवसायात प्रगती करावी असे आवाहन केमिस्ट हृदय सम्राट एमएससीडीए चे अध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे (Jagannath Appa Shinde) यांनी केमिस्ट बांधवाना केले. खामगाव येथील श्रीहरी लॉंस येथे बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन ची 38 सावी वार्षीक आमसभा संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एआयओसीडी व एम एससीडीए चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, एमएससीडीए चे मानद सचिव अनिल नावंदर, उपाध्यक्ष मुकुंद दुबे, उपाध्यक्ष अरुण बरकसे, खनिजदार वैजनाथ जागुष्टे, सहसचिव प्रसाद दानवे, पी आर ओ अजित पारेख, अमरावती झोन चे अध्यक्ष संजय पिपळखुटे ,एआओसीडी चे सदस्य रमन अग्रवाल, सदस्य एमएसपीसी गणेश बंगळे, सहाय्यक आयुक्त अशोक बर्डे औषध प्रशासन, औषध निरीक्षक गजानन घिरके, निलेश वाणी, राजेश कोटलवार मोहन अभ्यंकर, सुरेश पवार, ईश्वर मुथा, श्रीनिवास खाणी आदी पाहुण्याची प्रमुख उपस्थिती होती.

सभेला संबोधीत करताना अनिल नावंदर म्हनाले की परिवर्तन हा व्यवसायाचा नियम आहे. व्यवसायात प्रगती करण्यासाठी आधुनिक बदल स्विकारणे गरजेचे आहे. कोरोना काळात सर्व बंद असतांना केमिस्ट बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अहो रात्र सेवा दिली. मात्र शासनाने आमच्या केमिस्ट बांधवाचा कोरोना वारीयर उल्लेख केला नाही, ही खंत या वेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेन्द्र नहार यांनी आपल्या प्रास्ताविकात मागील सहा वर्षांच्या जिल्हा संघटनेच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत असताना विविध सामाजिक उपक्रम राबवून विविध घटकांना मदत करून संघटना मजबूत कार्य केले. रोग निदान शिबिर, वृक्षारोपण, तलाव खोली करण, ब्रेस्ट कन्सर शिबीर, प्लॅस्टीक सर्जरी शिबीर, मुक बधीर विद्यार्थ्यांना दत्तक घेणे, पळसखेड येथील सेवा संकल्प प्रतिष्ठानला मदत करणे, कोरोना योध्दा केमिस्ट बांधवासाठी करोना योध्दा सन्मान सोहळा 25 वर्षा पासुन सेवा देणारे वरीष्ठ सभासदांचा सन्मान असे अनेक कार्यक्रम जिल्हा संघटने कडुन राबविण्यात आले.

कोवीड काळामध्ये अनेक रुग्णांचे जिव वाचवण्या साठी अनिल यांनी ओषधी पुरवठा करुन प्राण वाचवीले. त्या अनुषंगाने सर्व सभासदांनी उभे राहुन टाळ्याच्या गजरात त्याचे अभिनंदन केले. त्यांच्या केलेल्या कार्याबद्दल एमएससिडीए ने कार्यकारी सदस्य पदी त्याची नियुक्ती करण्यात आली असे मानद सचिव अनिल नावंदर यांनी जाहीर केले. तसेच नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष पदी गजानन शिंदे तसेच सचिव रामचंद्र आयलानी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी माजी जिल्हा अध्यक्ष यांनी जिल्हा अध्यक्ष पदाचा अहवाल सादर केला तर गजानन शिंदे यांनी सचिव अहवाल व जगदीश नावंदर यांनी आर्थिक अहवाल या वेळी सादर करण्यात आला तसेच रमजान सणाचे औचित्य साधून इफ्तार पार्टी आयोजन करण्यात आले. या वेळी प्रेमचंद जैन, विजय पाटील, शेख इरफान शेख समद, प्रशांत ढोरे, पांडुरंग इंगळे सुमित बोरा, विजय इंडोले, अजिंक्य ठाकरे, विष्णू प्रसाद लाहोटी इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोपाल गांधी यांनी केले. तर आभार प्रदर्शन गणेश बंगळे यांनी मानले. या वेळी असंख्य केमिस्ट् बांधव या वेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.