Actuarial Science क्षेत्रात रोजगाराच्या नानाविध संधी उपलब्ध–प्रा.मनोज पाटील

0

जळगाव:येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालय जळगाव येथे गणित विभागातर्फे ‘गणित व संख्याशास्त्र आणि Actuarial Science विषयाची व्याप्ती तसेच रोजगाराच्या संधी’ या विषयावर कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या School of Mathematical Science येथील प्रा.मनोज पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.

यावेळी त्यांनी गणिताचे महत्त्व विषद करतांना मॅथेमॅटिक्स इज द युनिव्हर्सल लैंग्वेज ऑफ पॅटर्न अँड रिलेशनशिप असे सांगून त्याचा शेअर मार्केटशी कसा संबंध येतो हे सोदाहरण स्पष्ट केले.ते पुढे असेही म्हटले की आयआयपीएस, एन.पी. टी.इ. एल.,ए.सी. इ.टी.या गणित विषयाशी संबंधित परीक्षांच्या माध्यमातून रोजगार प्राप्त होऊ शकतो असे नमूद करून २०१९ ते २०२९ या दशकात रोजगाराची वाढ ३५%पर्यंत असू शकते. डाटा सायन्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयात प्रावीण्य संपादन करण्यासाठी गणित विषयाचा पाया भक्कम करणे अत्यावश्यक आहे. या कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे विज्ञान व वाणिज्य शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या उपप्रचार्या प्रा.के.जी. सपकाळे यांच्या शुभहस्ते श्री.मनोज पाटील सरांचा भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे,तिन्ही विद्या शाखांचे समन्वयक प्रा.स्वाती ब-हाटे, प्रा. प्रसाद देसाई, प्रा.उमेश पाटील, गणित विषय इन्चार्ज प्रा.छाया चौधरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.लीना भारंबे, प्रास्ताविक प्रा.छाया चौधरी, प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा.प्रमोद भोई व आभारप्रदर्शन प्रा.कविता भारुडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गणित विभागातील प्रा.घनश्याम सोनवणे, प्रा.प्रज्ञा पाटील, प्रा.छाया पाटील, प्रा.ज्योती सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.