धुळे शहरात लूट करणारे २ चोरटे पोलिसांच्या ताब्यात

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

धुळे शहर व परिसरात मागील काही दिवसात चोरी व लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. अशा जबरी चोरी करून लूट करणाऱ्या टोळीतील दोन चोरट्यांना धुळे शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी मुद्देमाल देखील ताब्यात घेतला आहे. धुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी एका हॉटेल कामगाराची तीन जणांनी रस्त्यात जबरी लूट केली होती. त्यांच्याकडून दुचाकी त्याचबरोबर पाचशे रुपये रोकड व मोबाईल असा ऐवज लंपास केला होता. या घटनेच्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता, या गुन्ह्यातील दोन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात एकूण तीन जण असल्याचे उघडकीस आले आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्यांकडून लुटलेला ऐवज देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे. तर या दोघं चोरट्यांचा आणखी एक साथीदार अद्याप फरार असून त्याचा देखील शोध धुळे पोलिसांतर्फे सुरु आहे. या गुन्ह्याची उकल झाल्यानंतर धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी कारवाई संदर्भात माहिती दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.