कासमवाडी येथे विहिरीत बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला

0

जळगाव येथील कासंम वाडी येथील परिसरात असणाऱ्या एका विहिरीत बेपत्ता असलेल्या एका 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आढळून आल्याची घटना आज उघडकीस आली असून तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

भूषण आनंदा भोळे वय 32 रा. देविदास कॉलनी असे मयत तरुणाचे नाव आहे.29 मार्च रोजी तो हरविल्याची तक्रार एमआय डिसी पोलीस स्टेशनला त्याच्या कुटुंबीयांनी दिली होती.आज त्या तरुणाचा मृतदेह आज  कासमवाडी भागातील खोकली माता मंदिराजवळ असलेल्या विहिरीत मृतदेह आढळून आला.

पुरुष मयत असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यावर  मुकेश पाटील नितीन ठाकूर ललित नारखेडे यांनी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटवून तोजिल्हा रुग्णालयात दाखल केला.याबाबत एम आय डीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोहेको रतीलाल पाटील. पोकॉ ठाकूर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.