कार्तिक आर्यन ‘या’ आगामी नवीन चित्रपटाच्या माध्यमातून करणार प्रेक्षकांचं मनोरंजन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Karthik Aryan) त्याच्या आगामी नवीन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कार्तिक आर्यन त्याच्या आगामी ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून कार्तिक आर्यनची चर्चा रंगताना दिसत आहे. त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला देखील सुरूवात झाली आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर समोर आले आहे. कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ हा आगामी चित्रपट पुढच्या वर्षी १४ जून २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. कार्तिकने काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला होता. कार्तिक आर्यनने दिग्दर्शक कबीर खान यांचे आभार आपल्या पोस्टद्वारे मानले आहे.

कार्तिक आर्यनने चित्रपटाचा एक सीन शूट करणे त्याच्यासाठी किती आव्हानात्मक होते हे सोशल मीडियावर सांगितले. कार्तिकने इन्स्टा पोस्टमध्ये ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कार्तिकने लष्करी अधिकाऱ्याचा गणवेश परिधान केलेला दिसत आहे. हातात रायफल घेऊन तो फायरिंग करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ३ तासांमध्ये या पोस्टला साडेचार लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.