धक्कादायक; कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवण्याची धमकी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शोष मोहीम सुरु कारली आहे. कर्नाटक राजभवनात रात्री साडेअकराच्या सुमारास धमकीचा फोन आला होता. यात राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. यंत्र सतर्क करण्यात आली आहे. सोबतच पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली आहे.

फोन कोणी केला याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. फोन आल्यानंतर बॉम्ब स्कॉडला कळविण्यात आले. त्यानंतर राजभवन परिसरात शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सदर घटनेमुळे घटनेमुळे सुरक्षा यंत्रणाची तारांबळ उडाल्याचं दिसून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.