टाईल्सने भरलेला ट्रक कन्नड घाटात कोसळला; दोन जण ठार

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

औरंगाबादकडे जात असताना टाईल्सने भरलेला ट्रक कन्नड घाटाच्या खोल दरीत कोसळल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

टाईल्सने भरलेला ट्रक (क्र. एम.एच.१८ एए ७४२३) चाळीसगावहून औरंगाबादकडे जात असताना अचानक कन्नड घाटाच्या खोल दरीत कोसळून फय्याज दरबार शेख (वय २४, रा. शेगाव जिल्हा. औरंगाबाद) व आसाराम आंबादास दाभाडे (वय २९, रा. मुरूमखेडा जिल्हा औरंगाबाद) या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:१६ वाजताच्या पूर्वी (वेळ निश्चित नाही) घडली आहे.

सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान शेख अनिल शेख गफ्फार रा. मुरूमखेडा जिल्हा. औरंगाबाद यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम- ३०४(ए), २७९, ४२७, १८४ व १३४(बी) अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि हर्षा जाधव हे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.