संक्रांतीला ‘काळा’ रंग परिधान करताय?… मग एकदा वाचाच

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या देशभरात मकर संक्रांतीच वातावरण पाहायला मिळत आहे. देशभरात मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा मकर संक्रांत १५ जानेवारी २०२४ ला आहे. शास्त्र आणि मान्यतांनुसार, सणाच्या दिवशी कपडे आणि त्यांच्या रंगाचं विशेष महत्व आहे. मकर संक्रांतीला कला रंग शुभ मानला जातो. बहुतेक लोक मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालतात किंवा साडी नेसतात. यंदाच्या मकर संक्रांतीला मात्र काळ्या रंगाचे कपडे घालतात किंवा साडी नेसतात. यंदाच्या मकर संक्रांतीला मात्र काळ्या रंगांचे कपडे घालण्याची चूक करू नका. यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी चुकूनही नेसू नका. यामागचं कारण काय आणि यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे घालणं शुभ राहील, हे जाणून घ्या.

यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका

संक्राती देवी कुठल्या रंगाचं वस्त्र परिधान करून येथे आणि देवीचं वाहन काय आहे, याला फार महत्व असत. मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाची साडी परिधान करून येते, तो रंग मकर संक्रांतीला वर्ज्य असतो म्हणजे त्या रंगाचे कपडे, वस्तू वापरत नाही. यंदा संक्रांती देवी ही काळ्या रंगाची साडी नेसून आणि घोड्यावर बसून, येणार आहे. त्यामुळे यंदाच्या संक्रांतीला काळा रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाहीत. त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका.

‘हे’ आहेत शुभ रंग

लाल-हिंदू धर्मात लाल रंगाला सौभाग्याचे प्रतीक मानतात. लाल रंग परिधान करणार्‍यांना देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद मिळतो, अशी धारणा आहे.

हिरवा-हिंदू धर्म लाल रंगाप्रमाणे हिरवा रंगही सौभाग्याचं प्रतिक मानला जातो. आराध्य दैवत गणपतीला हिरवा रंग आवडतो आणि हिरवा रंग धारण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात, असंही म्हटलं जातं.,

पिवळा-भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांचा पिवळ्या रंगाशी संबंध आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे कपडे परिधान करणे, लाभदायक मानले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.