लोकशाही न्यूज नेटवर्क
फैजपूर – वेळी अवेळी कामा साठी होणारी धावपळ त्यात बातमी साठी घेतलेली मेहनत हेच त्या पत्रकाराचे काम त्याच्या बातमी मध्ये असलेले यश दिसून येते.एखादी घटना घडली की त्याचे परिणाम काय होतील ह्याचा विचार न करता फक्त जनतेपर्यंत अगदी साध्या सरळ पद्धतीने पोहचविणे आणि सत्य हे जनते समोर आणणे आवश्यक आहे. हे फक्त एक हाडाचा पत्रकारच करू शकत असतो.
फक्त बुम माईक घेवून प्रेसकार्ड दाखवत मिरवणे म्हणजे पत्रकारिता नसून एका सच्चा पत्रकारासाठी त्याची निष्पक्षता म्हणजे त्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत,सत्याला खंबीरपणे साथ देणे आणि सत्याला वाचा फोडण्यासाठी कोणत्याही परिणामांचा सामना करण्याची तयारी ठेवावी लागते. प्रत्येक वेळेस ब्रेकिंग न्युज कधीच ही वेळ ठरवून घडलेली नसते बऱ्याच वेळेस मझ्या पत्रकार बांधवांना अर्धवट झोपेतून उठून सुद्धा वृत्तसंकलनासाठी जावे लागते.पत्रकारिता हे उपजीविकेचे साधन म्हणून नव्हे तर छंद म्हणून स्वीकारणे यासाठी फार मोठा त्याग पत्रकार करत असतात. पत्रकाराची लेखणी ही तलवारी पेक्षा तीक्ष्ण अन्याय,अत्याचार, गुंडगिरी, भ्रष्टचार या विरुद्ध लढणारी असते हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.अन्याविरुद्ध फक्त लेखणी चालवा म्हणजे समोरचा बरोबर घायाळ होईल. पत्रकार कधीच खरी बातमी देण्यास घाबरत नाही. पत्रकारिता जीवनाची सेवा आहे. ढोंग व अन्याय याचा विरूद्ध उपसलेली तलवार आहे.
पत्रकाराची लेखणी ही सत्यासाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्या शिपायांची तलवार आहे. पत्रकाराच्या लेखणीला जर धार नसेल तर सत्य सांगण्याचा आणि न्याय देण्याचा प्रयत्न त्याला यशस्वीपणे करता येणार नाही.जो पत्रकार सत्य वागतो सत्य लीहतो त्यांच्या विरुद्ध षडयंत्र रचले जाते. माध्यम कोणते ही असो जन संपर्क महत्वाचे आहे. आपण किती बातम्या ना न्याय दिला. कोणत्या बातम्या महत्त्वाच्या आहे व कोणत्या बातम्यांचा पाठपुरावा केला पाहिजे यावर त्या पत्रकाराचे मूल्यमापन ठरत असते.जे सत्य लिहत असता व अन्याय अत्याचार ला वाचा फोडत आहेत त्यांच्या पाठीशी समाजाने खंबीर पणे उभे राहिले पाहिजे.गेल्या ४-५ वर्षांपासून आम्ही खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन फैजपूर तर्फे पत्रकार बांधवांचं आपल्या प्रती ऋण म्हणून आदर सत्कार करण्यात येतो. आज पत्रकरितेला आपण लोकशाही चा चौथ्या स्थंभाचा दर्जा देत असतो. पत्रकारिता म्हंटले म्हणजे आपल्याला वर्तमान पत्र आठवते जगातील प्रत्येक व्यक्तीची सुरवात ही सकाळी गरम चहाचा कप हातात घेवून वर्तमान पत्र वाचत होत असते. पत्रकार हा समाजातील असा आधार स्तंभ आहे जो समजात घडत असलेल्या भ्रष्टाचार, चोरी, अन्याय व समाजात घडत असलेल्या सर्व गोष्टी ह्या समाजा समोर, जनते समोर सर्व गुन्हे मांडत असतो.