Saturday, January 28, 2023

पारोळ्यात वीज कर्मचाऱ्यांचा संप

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा – महाराष्ट्र शासनाच्या विरोधात व खाजगीकरणाच्या (khajgikaran) निषेधार्थ महावितरणच्या तिन्ही कंपन्यांनी तीन दिवसाचा संप पुकारला आहे.या संपात तालुक्यातील महावितरणचे (mahavitaran) कर्मचारी सहभागी झाले आहेत.

या संपात विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन,कामगार महासंघ,वर्कर्स फेडरेशन, इंजिनियर असोसिएशन, ऑपरेटर संघटना आदी संघटना सहभागी झाल्या आहेत.शहर अभियंता गौतम मोरे,रजनीश सराफ,एल.एम.पाटील,वसंत पाटील,सुरेश मोरे,एम.जी. पाटील,सतीश गोसावी,काशिनाथ जाधव,संदीप सोनवणे,संकेत बडगुजर, सुनील राठोड,प्रवीण पाटील,विकास पवार,सागर वाघ, सागर चौधरी,नितीन सोनार, सुनील बेलदार,महावीर बुरसे, किरण चौधरी,धनंजय सूर्यवंशी, प्रमोद चौधरी,विशाल सोनवणे, पंकज पाटील, समाधान देवरे, सुभाष सोनवणे,सागर पाटील, अक्षय पाटील,राहुल पाटील, अमोल पाटील,शरद पाटील, योगेश पाटील,भाऊसाहेब पाटील, योगेश जी.पाटील,श्रीकांत पाटील, विलास पाटील,नीलेश गायकवाड, जयेश कुलकर्णी,विनोद धनगर, नीलेश राजपूत,हेमंत मराठे,श्री. रोकडे, राहुल मराठे,राकेश जगदाळे,रमेश पाटील,मंगेश भावसार,दीपक भोई,दिलीप चौधरी, श्री.जोगी,आर.जे.पाटील आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.हा संप वीज ग्राहक किंवा शेतकरी यांच्या विरोधात नसून शासनाच्या धोरणाच्या विरोधात आहे.त्यामुळे जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून तालुक्यातील सहा उपकेंद्रांवर प्रत्येकी दोन ऑपरेटर तर तालुक्यात १५ आउट डोअर असे २७ कर्मचारी कार्यरत आहेत.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे