जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरवर बंदी येणार ? कर्करोग होत असल्याचा दावा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

लंडन

जगातील प्रसिद्ध हेल्थकेयर कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) च्या बेबी पावडर (Baby Powder) वर यूनायटेड किंगडम (UK) सह जगभर बंदी घातली जाऊ शकते.

कंपनीच्या एका शेअरहोल्डरने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडरवर बंदी घालण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवर जगभर 34 हजारांपेक्षा जास्त खटले दाखल आहेत. यातील बहुतेक खटले महिलांनी दाखल केले आहेत. बेबी पावडरच्या वापराने Ovarian कँसर झाल्याचा दावा महिलांनी केला आहे. परंतू, कंपनीने या सर्व दाव्यांचे खंडन केले असून, त्यांचे पावडर सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.

द गार्डियनच्या एका रिपोर्टनुसार, जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या बेबी पावडरची 2020 मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये विक्री बंद केली होती. अमेरिकन रेगुलेटरकडून झालेल्या तपासात जॉनसनच्या बेबी पावडरमध्ये Carcinogenic Chrysotile Fibres आढळले होते. यानंतर बेबी पावडरच्या विक्रीत मोठी घट झाली होती.

Talc ला जगातील सर्वात सॉफ्ट मिनरल म्हटले जाते. याची मायनिंग जगातील अनेक देशात केली जाते. Talcचा वापर पेपर, प्लास्टिक आणि फार्मास्युटिकल कंपन्यात केला जातो. याचा वापर रॅश आणि इतर पर्सनल हायजीनसाठी केला जातो. कधी-कधी Talc चा साठा Asbestos मुळे दूषितही होतो. हे शरीरात गेल्यावर खनिज कँसर होण्याची शक्यता असते.

Leave A Reply

Your email address will not be published.