कोरोना विषाणूचा परिणाम अनेक दशके जाणवेल; जागतिक आरोग्य संघटनेचा दावा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव जगभरात सुरु आहे. अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी काही देशांमध्ये कोरोनाचा कहर कायम आहे. यात आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अ‍ॅडहानॉम गेब्रेयेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी असा दावा केला आहे की, कोरोना महामारी संपुष्टात आल्यानंतरही अनेक वर्षांपर्यत याचे परिणाम दिसतील.

अनेक दशके कोरोनाचा परिणाम जाणवेल

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी चेतावणी दिली आहे की, येत्या काळात कोरोना विषाणूचे आणखी नवीन प्रकार समोर येतील. तसेच कोरोना महामारीचा प्रभाव दीर्घकाळ टिकू शकतो. त्यामुळे लोकांवर त्याचा परिणाम अधिक घातक ठरू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांचा विश्वास आहे की, कोरोना महामारीचे दुष्परिणाम अनेक दशकांपर्यंत जाणवू शकतात. त्यांनी सांगितले की, लसीकरणाबाबत जगातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात असमानता आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस पुढे म्हणाले की, सध्या जगातील देशांमधील लोकसंख्येपैकी केवळ 42 टक्के लोकांना लसीकरणाचा दुसरा डोस मिळाला आहे. आफ्रिकन देशांमध्ये लसीकरणाचे सरासरी प्रमाण केवळ 23 टक्के आहे. ही विषमता भरून काढणे अत्यंत आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे हे तातडीचे प्राधान्य आहे. साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासोबतच जीव वाचवण्यासाठी आणि उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी आम्ही मदत करत काम करत राहू यावरही त्यांनी भर दिला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.