गॅस कटरने ATM फोडले; लाखोंची रोकड लंपास

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

जामनेर शहरातील पाचोरा रस्त्यावर असलेल्या आयडीबीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री गॅस कटरने कापून सुमारे १२ लाख ७८ हजारांची रोकड लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरी करतांनाची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर शहरातील पाचोरा रस्त्यावर असलेल्या आयडीबीआय बँक एटीएम रात्रीच्यावेळी चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने फोडले. बुधवार २६ जानेवारी रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास हे एटीएम फोडले आहे. अवघ्या १५ मिनीटात एटीएम मधील पैसे लंपास केले. ही माहिती मिळताच पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला.

सदर घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी शाखाधिकारी प्रसुन परेशनाथ घोष (वय ३६, रा. जामनेर) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.