अमरावती येथे प्रजासत्ताक दिनानिम्मित पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

अमरावती; स्वातंत्र्याबरोबरच न्याय समता बंधुता एकता ही मूल्ये स्वीकारून देशाने जगाच्या पटलावर स्वतःची दृढ ओळख निर्माण केली .आहे याच लोकशाही मूल्याशी बांधिलकी ठेवून लोकशाही आघाडी शासनाची वाटचाल होत आहे प्रत्येक संकटावर मात करत यापुढेही विकासाचे चक्र अविरतपणे गतिमान ठेवण्याचा निर्धार आहे. असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण समारंभ येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले . त्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत संबोधित केले .

यावेळी . विभागीय आयुक्त पियुष सिंह विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना जिल्हाधिकारी पवणीत कौर पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत  पंडा, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते कोबी नियमांचे पालन करून मर्यादित उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला

यावेळी पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणातून जिल्ह्यातील कृषी आरोग्य शिक्षण पायाभूत सुविधा आदी विविध क्षेत्रातील विधायक बदलांवर प्रकाश टाकत जिल्ह्यात विकासाची प्रक्रिया अधिकाधिक सर्वसमावेशक लोकहितकारी व गतिमान करण्याचा निर्धार श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केला

Leave A Reply

Your email address will not be published.