मनपातर्फे जळगाव शहरात मतदान जनजागृतीसाठी रॅली

0

जळगांव ;- लोकसभा निवडणूक २०२४ चे वारे संपूर्ण देशात जोर धरु लागले आहेत. त्याच धर्तीवर जळगांव शहर विधानसभा मतदार संघात मतदान जन जागृती निमित्त स्वीप -मतदार जनजागृती कक्ष यांचेवतीने आज दि.१३ रोजी जळगांव शहरातील मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या दृष्टीने तसेच मतदारांना निवडणुकीचे महत्व व मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

मतदार जन जागृती कक्षाचे नोडल अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त श्रीमती, अश्विनी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहा. नोडल अधिकारी तथा मनपा शाखा अभियंता प्रकाश पाटील यांचे संकल्पनेतून सदर रॅलीचे यशस्वी नियोजन करण्यात आले. सकाळी ७.१५ वाजता काव्य रत्नावली चौका पासून रॅलीस सुरुवात झाली. काव्यरत्नावली चौक कोर्ट चौक शास्त्री टावर चौक चित्रा चौक अण्णाभाऊ साठे चौक स्वातंत्र चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयात रॅलीची सांगता झाली.
आजच्या रॅलीत जिल्हा निवडणूक तथा जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद सहा. निवडणूक अधिकारी श्री. सुधळकर, जळगांव मनपा आयुक्त श्रीमती. पल्लवी भागवत, तहसिलदार श्रीमती. शितल राजपूत, मनपा उपायुक्त अविनाश गांगोडे, आयकर विभागाचे सहा. आयुक्त . योगेश पाटील यांचेसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी समवेत शहरातील रिसायकल ग्रुप चे समीर रोकडे, महेश सोनी व त्यांचे संपुर्ण सहकारी सायकल पटू व रोटरी सदस्य असे एकूण १२० सायकल स्वारांनी रॅलीत सहभाग नोंदविला. सदर रॅलीत मनपा व शासकीय रुग्णालयाचे रुग्णवाहीका तैनात ठेवलेल्या होत्या. रॅलीच्या मार्गावर चोख बंदोबस्त व मार्ग सुकर होणे कामी ट्रॅफीक विभागाचे वाहतूक निरिक्षक श्री. इंगोले व त्यांचे सहकारी यांनी मदत केली.

सर्व शासकीय अधिका-यांसाठी धुलीया सायकल यांचे तर्फे सायकलींची व्यवस्था करण्यात आली होती. मतदार जनजागृती संदर्भात काव्यरत्नावली चौकात रांगोळी काढण्यात आली. यशस्वीतेसाठी विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी, अभियंता योगेश बोरोले, गायत्री पाटील, कवीता पाटील, शितल कंखरे, राहूल बडगुजर, सुयश सोनटक्के, बापू बनसोडे आदींनी नियोजनात भाग घेऊन रॅली यशस्वीपणे पूर्ण करण्यास परिश्रम घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थितांचे. प्रकाश पाटील यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली

Leave A Reply

Your email address will not be published.