“बोल्ड युवर ब्रँड टू बिल्ड युवर प्रॉफिट” या विषयावर संजय अरोरा यांचे व्याख्यान…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

गेल्या दोन वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्य करतांना इतरही रोटरी क्लबला सोबत घेऊन वेगळे काही उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ जळगाव रॉयल्सतर्फे येत्या दि. १५ जुलै रोजी जिल्हा नियोजन विभागाच्या हॉलमध्ये शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, व्यावसायिक, औद्योगिक वसाहतीतील उद्योगांचे संचालक तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी करीता प्रतिथयश ब्रॅण्डिंग गुरू संजय अरोरा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोटरी जळगाव रॉयल्सचे अध्यक्ष सचिन जेठवाणी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सुवर्ण नगरी, उद्योग व व्यापार नगरी म्हणून आपल्या जळगावचा नावलौकिक सर्वज्ञात आहे, परंतु मधल्या काळात बरेच व्यावसायिक परिवार जळगावमधून बाहेर पडून इतरत्र व्यवसाय वाढऊ पाहत आहेत, असे न करता आपल्याच शहरात राहून आपल्या उत्पादनाचे ब्रॅण्डिंग करून त्याचा आपल्यालाच कसा जास्त फायदा होईल या करीता वरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत आहे.

ब्रॅण्डिंग प्रक्रियेमध्ये विविध तंत्रांचा समावेश कसा केला जातो. यामधील प्रत्येकाला प्रश्नात उत्पादनाविषयी सुसंगतता निर्माण करण्यासाठी काय केले जाते. गेल्या काही वर्षापासून, ब्रॅण्डिंग संकल्पनेमध्ये अंमलबजावणीच्या दृष्टीने अभूतपूर्व बदल झालेला पाहायला मिळतं आहे.

तो कसा. पार्श्वभूमी बॅनर आणि ब्रॅण्डिंग स्टैंडीपासून ते लघुपट आणि व्यावसायिक जाहिरात, ऑनलाईन कान्टेस्ट, मजेदार उपक्रम, मोफत गोष्टी आणि अजूनही बऱ्याच घडामोडी ब्रॅण्डिंगमध्ये होत आहेत. आज तुमच्याकडे संगीताच्या इव्हेंटमध्ये फूटवेअरचे समर्थन करणारे सेलिब्रिटी आहेत, गायक त्यांच्या गाण्यांमध्ये ब्रॅण्डच्या नावांचा वापर करतात आणि मुलाखतीच्या वेळी प्रॉडक्ट किंवा सेवेचा उल्लेख करतात. ब्रॅण्डिंगचा अर्थ अगदी स्पष्ट शब्दात संदेश देतो आणि टार्गेट प्रेक्षकांना काय हवंय, याविषयी पूर्वकल्पना देतो. मार्केटिंगमध्ये ब्रॅण्डिंग उत्पादन जागरूकता वाढवण्यात कशी मदत करते. तसेच, ते व्यवसाय आणि संस्थेची मूल्ये स्पष्ट करून प्रेक्षकांमध्ये विश्वास निर्माण करते. ब्रॅण्डिंगला सीमा नाहीत, तुम्ही त्याचा कसा वापर करता त्यावर त्याची विशेषता अवलंबून आहे. ब्रॅण्डिंग हा सर्व-शक्तिशाली उपक्रम आहे जो लोगो डिझाईन करण्यापासून सुरू होतो. या व अशा असंख्य विषयावर संजय अरोरा माहिती देणार असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.