विजेच्या धक्क्याने बैल जोडी दगावली; नुकसान भरपाईची मागणी…

0

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

यावल तालुक्यातील कोळवद येथील शेतकरी सुनील अशोक चौधरी हे सकाळी शेतात कामासाठी गेले असताना, ते आपल्या मजुरांसह बैलजोडीच्या साह्याने पेरणी करत होते. त्यादरम्यान पावसाचे वातावरण झाल्यामुळे ते दुपारी तीन वाजेच्या सुमारास मजुरांना घेऊन परत येत असताना इलेक्ट्रिक पोलच्या आर्थिंग मध्ये वीजप्रवाह उतरल्याने बैलगाडीवरील महिला ब पुरुष मजुरांना विजेचा धक्का जाणवल्याने त्यांनी उडी टाकून आपले प्राण वाचवले. मात्र या विजेच्या धक्क्याने बैल जोडी दगावली.

बैल जोडीच्या जाण्याने सुनील अशोक चौधरी यांची एक लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे समजते. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने त्या ठिकाणी जाऊन पंचनामा व तात्काळ शेतकऱ्याला भरपाई द्यावी अशी संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आधीच शेतकरी वर्ग संकटात असल्यामुळे शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी अधिक त्रस्त झालेला आहे, त्यामुळे कोळवद येथील शेतकऱ्याला तातडीने भरपाई मिळावी यासाठी गावातील ग्रामस्थ बोलत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.