जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
आसोदा रेल्वेगेटजवळ ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा चाकाखाली दबून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती.
विठ्ठल यशवंत रायसिंग (कोळी) (वय-४५, रा. आसोदा ता.जि.जळगाव) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते ट्रक्टर चालक असून ट्रॅक्टर चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. बुधवार २ फेब्रुवारी रोजी विठ्ठल कोळी हे जळगावहून आसोदाकडे रिकामे ट्रॅक्टर घेवून जात होते. त्यावेळी आसोदा रेल्वे गेट बंद होते. ट्रॅक्टर थांबवून रेल्वे जाण्याची वाट बघत असतांना ट्रॅक्टरचा अचानक ब्रेक फेल झाल्याने त्यांचा ट्रक्टरवरील ताबा सुटला व ते खाली पडले.
दरम्यान ट्रक्टरचे चाक अंगावरून गेल्याने ट्रक्टर चालक विठ्ठल कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. खासगी वाहनाने मृतदेह जिल्हा शासकीय विद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. मयताच्या पश्चात आई मिराबाई, पत्नी सरला, बबलू आणि जयवंत हे दोन मुले आणि विवाहित मुलगी दिपाली, सुन असा परिवार आहे.