टिपू सुलतान यांचा अवमान करणाऱ्या फडणवीसांचा निषेध

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त बहुजन समाजाचे प्रेरणास्थान असणाऱ्या हजरत टिपू सुलतान यांचा अवमान करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यासाठी व सामाजिक धार्मिक सलोखा बिघडवल्यामुळे गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन क्रांती मोर्चा व छत्रपती क्रांती सेने या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

हजरत टिपू सुलतान हे मूलनिवासी बहुजनांच्या हक्क व अधिकारासाठी लढणारे योद्धा होते. हजरत टिपू सुलतान यांच्याविषयी फडवणीस यांनी केलेले वक्तव्य हे बिनबुडाचे व तथ्यहीन आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व बहुजन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अमजद रंगरेज, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक राजेंद्र खरे, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील यांनी केले.

या आंदोलनात खान्देश प्रभारी सुमित्र अहिरे, महासचिव बहुजन मुक्ती पार्टी विजय सुकाळे, शहराध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी इरफान शेख, विषाल अहिरे, नितीन अहिरे, अक्षय तायडे, भारतीय विद्यार्थी मोर्चा घनश्याम वाडे, निलेश सपकाळे, महेश मोरे, रवींद्र वाडे, जळगाव लोक सभा प्रभारी बहुजन मुक्ती पार्टी, गोपाळ कोळी, डॉ. शकील शेख जळगाव जिल्हा जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, सुकलाल पेंढारकर, तालुका अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा, विनोद अडकमोल युवा अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी इ .उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.