Friday, August 12, 2022

तरूणाला मारहाण करून लुटले; गुन्हा दाखल

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

तरूणाला शिवीगाळ व मारहाण करून खिश्यातील ५ हजार रूपये जबरी हिसकावून तिघेजण पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवाशी मयंक रमेश मताणी (वय २०) हा आपल्या कुटुंबियांसह राहतो.  सोमवारी ६ जून रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मयंक हा सिंधी कॉलनीतील बाबा हरदास मंगल कार्यालयाजवळून दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी दारूच्या नशेत अज्ञात तीन जण (एमएच १९ बीएक्स ०५२९) ने येवून मयंकला थांबविले.

दरम्यान यातील एक जण म्हणाला की, “तू आमच्या गाडीस ठोस मारली व आमच्या गाडीचे नुकसान केले” असे सांगून मयंकच्या खिश्यातील ५ हजाराची रोकड जबरी काढून घेतली आणि मारहाण करत पे फोनने ५०० रूपये टाकण्यास भाग पाडले.

याप्रकरणी मयंक मताणी याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मंगळवारी ७ जून रोजी सकाळी ८ वाजता अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या