बनावट पावत्याप्रकरणी नशिराबाद टोलनाक्यावर पोलिसांची मोठी कारवाई

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबई- नागपूर महामार्गावर असलेल्या जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे टोलनाक्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या पथकाने गुरुवार दि.  २१ जुलै रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास अचानक छापा टाकला. टोलनाक्यावर रात्री उशिरापर्यंत  कारवाई सुरू होती.

मुंबई- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नशिराबाद गावाजवळ टोलनाका उभारण्यात आला आहे. नुकतेच या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले असून,  नशिराबाद नाक्यावर बोगस बनावट पावत्यांच्या आधारावर वाहनधारकांकडून टोलटॅक्स वसूल करण्यात येत होता. या संदर्भात आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरुपात तक्रार केलेली होती.

सदर तक्रारीची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या विशेष पथकाने गुरुवारी दि.  २१ जुलै रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास अचानक छापा टाकला. पथकाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बनावट आणि नकली पावत्या आढळून आल्याचे पोलिस दलाकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणात संपूर्ण चौकशी झाल्यानंतर रात्री उशिरा नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.