तलवारीचा धाक दाखवणारा माथेफिरू जळगाव गुन्हे शाखेच्या ताब्यात…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जळगाव गुन्हे शाखेने तलवारीचा धाक दाखवणाऱ्या एका माथेफिरूला अटक केली आहे. जळगाव तालुक्यातील एका गावात तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍या संशयिताकडून तीन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. हर्षल विनोद राजपूत असे अटक करण्यात आलेल्या माथेफिरू तरुणाचे नाव आहे. संशयिताविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश राजपुत, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चौबे, अनिल जाधव, नंदलाल पाटील, महेश महाजन, गोरख बागुल, संदीप सावळे, प्रितम पाटील, जयंत चौधरी, अनिल देशमुख, भगवान पाटील, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, किरण चौधरी, उमेश गोसावी, लोकेश माळी, अशोक पाटील, प्रमोद ठाकुर, मोतीलाल चौधरी आदींनी गोपनीय माहितीवरून ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.