मैत्रीचा बहाणा: अश्लील व्हिडीओ बनवून चालकाला लुटले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मैत्रीच्या बहाण्याने महिलेने कॉल करुन वाहन चालकास बोलावून त्याचा अश्लील व्हिडीओ तयार करुन रोख रक्कम, दागिने व मोबाईल बळजबरीने हिसकवल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात घडली आहे.

जळगाव शहरातील तहसील कार्यालय परिसरात एका इमारतीत असलेल्या एका फ्लॅटमधे एका महिलेने एका वाहन चालकास मैत्री करण्याच्या बहाण्याने बोलावले. कॉलवर गोड बोलणाऱ्या महिलेच्या आवाजाला भुलून वाहन चालक त्या इमारतीत महिलेला भेटण्यास गेला. त्या ठिकाणी अगोदरच एक महिला व तिच्यासोबत दोन पुरुष साथीदार हजर होते. तिघांनी संगनमत करत त्या वाहनचालकाला मारहाण करत त्या महिलेसोबत सेक्स करण्यास भाग पाडले. या बळजबरी समागमाचा व्हिडीओ तयार करण्यात आला. त्या व्हिडीओच्या बळावर त्याला ब्लॅकमेल करण्यात आले. त्याच्याकडून 65 हजार रुपये किमतीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा ऐवज काढून घेण्यात आला.

दरम्यान सदर  व्हिडीओ नातेवाईकांकडे पाठवण्याची धमकी देत त्याला अजून पन्नास हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली. ती वसुल करण्यासाठी त्याला आव्हाणा शिवारात एका जागी नेण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून  पुढील तपास स.पो.नि. किशोर पवार करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.