१५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह राहते. १८ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरी एकटी होती.
यावेळी संशयित आरोपी भुषण तुकाराम कोळी रा. डांभुर्णी ता. यावल याने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीचे वडील यांनी दिली आहे.

दरम्यान त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र अल्पवयीन मुलगी आढळून आली नाही. म्हणून त्यांनी रविवारी २० मार्च रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. या तक्रारीवरून संशयित आरोपी भुषण कोळी रा. डांभूर्णी ता. यावल याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.