पैसे तिप्पट करण्याचे आमिष; चालकाला २ लाखात गंडवले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

चालकाला पैसे तिप्पट करण्याचे आमिष देवून २ लाखात फसवल्याची घटना उघडकीस आलीय. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नथ्थू काशीनाथ कोळी (वय ४६, रा. बाळापूर फागणे ता.जि. धुळे) हे चालक असल्याने खासगी वाहनाने जळगाव जिल्ह्यात येतात. १८ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ते जळगावात आले. त्यावेळी त्यांची भैय्या महाजन, एक अनोळखी व्यक्ती आणि मोबाईल क्रमांक धारक ९१७५०८७३२९ यांची ओळख निर्माण झाली.

दरम्यान तिघांनी नथ्थू कोळी यांचा विश्वास संपादन करून त्यांना तुमचे पैसे तिप्पट करून देतो असे आमिष दाखविले. यांनतर नथ्थू कोळी यांनी जवळ असलेले दोन लाख रूपये दिले. त्यानंतर तिघांनी सहा लाख रूपये भरलेले बनावट नोटांची बॅग नथ्थू कोळी यांना देवून पसार झाले. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नथ्थू कोळी यांनी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.

नथ्थू कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात भैय्या महाजन, एक अनोळखी व्यक्ती आणि मोबाईल क्रमांक धारक ९१७५०८७३२९ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.