१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना० ८ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मंगळवार ८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ ते बुधवार ९ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता या दरम्यान मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांनी तिचा नातेवाईकांसह मैत्रिणींकडे शोधाशोध केली. परंतु ती कुठेही आढळून आली नाही.

याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता अल्पवयीन मुलीचे वडील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.