वयोवृध्दाच्या मानेला चाकू लावून लुटले; तिघांवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

७८ वर्षीय वयोवृध्दाला मेहरूण तलावाजवळील एका गल्लीत नेवून अज्ञात तीन जणांनी मानेला चाकू लावून रोकड व मोबाईल असा एकुण १६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिवारी २९ जुलै रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तमराव नामदेव वाघ (वय ७८, रा. द्वारका, नाशिक) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते  रेल्वे विभागात सिनीयर सेक्शन इंजीनीयर या पदावरून सेवानिवृत्त आहेत. त्यांची लहान मुलगी जळगावातील संत गाडगेबाबा चौकात राहत असल्याने त्यांना भेटण्यासाठी उत्तमराव वाघ हे सायंकाळी जळगावात रेल्वेने आले.

मुलीच्या घरी जाण्यासाठी ते रिक्षाने बसले. रिक्षात आगोदर दोन जण बसले होते. रिक्षा इच्छादेवी चौक, डी-मार्ट पाईंटवरून संत गाडगेबाबा चौक न जात थेट मेहरूण तलावाजवळील एका गल्लीतील अंधारात घेवून गेला. त्यावेळी तिन जणांनी अचानक उत्तमराव वाघ यांच्या मानेला चाकू लावून खिश्यातील ४ हजाराची रोकड आणि १२ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून पसार झाले.

याप्रकरणी उत्तमराव वाघ यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ११ वाजता अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.