Jalgaon Accident; पिकअप पलटी होऊन महिला जागीच ठार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय महामार्गावर एकलग्न गावाजवळ चारचाकी पिकअप वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. बदरे आलं शमीम मोहम्मद शहा (वय ४० रा. धुळे) हे १६ ऑक्टोबरला बहीण सारजान बानो अजिज अहमद शाह, पत्नी साफिया व मुलांसोबत चारचाकी पिकअप वाहनाने (एमएच १९ सीवाय ९७४१) जळगावहून धुळे येथे जाण्यासाठी निघाले होते.

राष्ट्रीय महामार्गावर एकलग्न गावाजवळ चारचाकी पिकअप वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. बदरे आलम शमीम मोहम्मद शहा (वय ४० रा. धुळे) हे १६ ऑक्टोबरला बहीण सारजान बानो अजिज अहमद शाह, पत्नी साफिया व मुलांसोबत चारचाकी पिकअप वाहनाने (एमएच १९ सीवाय ९७४१) जळगावहून धुळे येथे जाण्यासाठी निघाले होते.

त्यावेळी वाहन हे एकलग्न (ता. धरणगाव) गावाजवळून जाताना रात्री साडेबाराला चालकाने ‘ओव्हरटेक’ करण्याच्या नादात वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप गाडी रस्त्यावर पलटी झाली. अपघातात सारजान बानो अजिज अहमद शाह या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. इतर सर्व जण गंभीर जखमी झाले होते. जखमींना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

सोमवारी (ता. ३०) सायंकाळी सहाला पिकअप वाहनावरील चालकाविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक विठ्ठल पाटील हे तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.