मू.जे.च्या हिवाळी शिबिराचे कडगावात उदघाटन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मू.जे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन कडगाव ता, जि.जळगाव येथे दि 28 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2023 यादरम्यान करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन दि 29 जानेवारी 2023 रोजी कडगाव येथील सैन्य दलातील सैनिकाच्या परिवारातील सदस्य भगवान सोनवणे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करुन करण्यात आले.

कार्यक्रमाला सरपंच उत्कर्षा पाटील, जीवन शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव राजेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील उपस्थित होते. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व हेतूकथन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.दिलवरसिंग वसावे यांनी केले. सरपंच उत्कर्षा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सातदिवसीय शिबिरात स्वच्छ भारत अभियान, ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण जागृती, बालविवाह कायदा, आपत्ती व्यवस्थापन, अन्नपदार्थ सुरक्षा जनजागृती मोहीम या विषयावरील कार्यक्रम व दररोज विविध विषयांवर व्याख्याने यांचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिरार्थी विद्यार्थी गुणवंत बोरसे तर आभार लीना बारी हिने केले. यावेळी सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ विशाल देशमुख, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ नम्रता महाजन, डॉ चेतन महाजन, डॉ गायत्री खडके, प्रा गोपीचंद धनगर, प्रा अश्विनी बारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.