विधवा भावजयी जेठाच्या अत्याचारातून गरोदर

पीडितेच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जेठ आणि भावयजीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अमळनेर (Amlner) तालुक्यातील एका गावात जेठाने सख्या लहान भावाच्या विधवा पत्नीवर मुलाला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अत्याचारातून पिडीता गरोदर (The victim is pregnant)  राहिली असून तिच्या तक्रारीनुसार बुधवार, मारवड पोलिसात (Marwad Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. पिडीतेला आधार नसल्याने तिला जळगाव येथील शासकीय आशादीप वसतीगृहात (Jalgaon Ashadeep Girls Hostel) दाखल करण्यात आले आहे.

साधारण सहा-सात महिन्यापूर्वी येथे तिचा जेठाने सासरी असतांना पिडीतेला तुझ्या मुलाला मारुन टाकेल अशी धमकी देत इच्छेविरुध्द पिडीतेसोबत शारिरीक संबध प्रस्थापित केले. यामुळे पिडीता गरोदर राहिली. एवढेच नाहीतर सासु, सासरे जेठाणी यांनी पीडीतेच्या पोटावर लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच  शिवीगाळ करत छळ केला.

याप्रकरणी पिडीताने धुळे शहर पोलिसात फिर्याद दिली होती. शून्य क्रमांकाने तो गुन्हा बुधवारी पिडीतेचा जेठ तसेच जेठाणी, सासू व सासरे या चार जणांविरोधात मारवड पोलिसात दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे करीत आहेत.

दरम्यान पीडितेला आधार नसल्यामुळे तिला जळगावच्या आशादीप महिला संरक्षण केंद्रात ठेवण्यात आले. तर संशयित जेठ  गोपाल भोई याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here