पिकाच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्याचे उपोषण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील शेतकऱ्याने आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मांडले आहे.

राष्ट्रीय महामार्ग ६ चे सन २०२० मध्ये काम चालू असताना रोड तयार करतेवेळी वडीलोपार्जित शेती गट नं. १२९/१ व १२९/२ हे घोडसगाव, ता. मुक्ताईनगर शिवारात असून सदर शेतीमध्ये केळी हया पिकाची लागवड केलेली होती. हायवेच्या कामामुळे पाण्याचा नैसगिक निचरा होण्याचा मार्ग बंद पडल्यामुळे सदर शेतातील केळी या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

सदर नुकसान भरपाईसाठी तहसिलदार सो. मुक्ताईनगर यांच्याकडे दिनांक २६/८/२०२० रोजी अर्ज सादर केलेला होता. तसेच उपविभागीय अधिकारी  भुसावळ यांच्याकडे दिनांक ०८/०२/२०२० रोजी अर्ज सादर केलेला आहे. तरी सदर कृषी अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच व तलाठी यांनी शेताची पाहणी करून पंचनामा  केलेला असून सुद्धा सदर अर्जाचा विचार न करता पिकाचे नुकसान भरपाई शासनाकडून आजपावेतो मिळालेली नाही.

तसेच ह्या वर्षी देखील शेतामध्ये वरील नमूद गटात ऊसाची लागवड केलेली आहे. हायवेच्या कामामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्याचा मार्ग बंद पडल्यामुळे ऊसाचे देखील नुकसान झालेले आहे. सदर नुकसान भरपाई त्वरीत मिळावी यासाठी श्रीकृष्ण प्रल्हाद भगत हे जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे उपोषणाला बसले आहे. तसेच त्याबाबत होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.