जळगावच्या ‘महालक्ष्मी मंदिरा’त साकारण्यात आली राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती (व्हिडिओ)

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या सर्वत्र रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. शहरांमध्ये पताका, झेंडे आणि लाइटिंगने सर्वत्र सजावट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जळगाव नगरी सर्वत्र लावलेल्या लाइटिंग मुळे उजळून निघाली आहे. जळगाव शहरात सुद्धा आनंदमय वातावरण आहे.

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला आपण प्रत्यक्ष जाऊ शकत नाही, त्यासाठी सुभाष चौकातील ‘महालक्ष्मी मंदिरा’त अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. सर्व भाविकांना या राम मंदिराचे दर्शन व्हावे व रामलल्ला डोळे भरून बघता यावे. यासाठी हुबेहूब अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. जे भाविक प्रत्यक्ष अयोध्येत जाऊन दर्शन घेऊ शकत नाही, ते भाविक या ठिकाणी दर्शन घेऊ शकतात व मन भरून आपल्या राम लल्ला बघू शकतात.

मंदिराच्या प्रतिकृतीचे काम मागच्या दीड महिन्यांपासून सुरू आहे. मंदिर बनविण्यासाठी प्रत्येकाने मदत केली आहे. राम मंदिर लाकूड, फायबर, थर्माकोल अशा वस्तूंनी तयार झाले आहे. मूर्तिकार विनोद पारधी, राजेश नाईक आणि सुभाष चौक मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांच्या वतीने ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.

सर्व भाविक या ठिकाणी उत्साहाने भेट देत आहे. मन भरून बघत आपल्या रामलल्लाचे दर्शन घेत आहेत. सदर परिसरात राम पताका, झेंडे यांनी सजावट करण्यात आली आहे. उद्या सकाळी भजनांचा कार्यक्रम आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन सुभाष चौक मित्र मंडळाकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.