सावधान; प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची WhatsApp लिंक होतेय व्हायरल, एक क्लिक पडेल महागात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अयोध्येत सोमवारी रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. हा सोहळा लाईव्ह पाहण्यासाठी काही ठगांकडून बनावट लिंक तयार करण्यात आलेल्या आहेत. या लिंकमुळे तुमच मोठं नुकसान होऊ शकत. यासंदर्भात अलर्ट दिलेला आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंगच्या नावावर सायबर गुन्हेगार बनावट लिंक देऊन फसवणूक करू शकतात. त्यामुळे तुम्हाला whatsapp मेसेज आल्यानंतर त्या लिंकसंदर्भात खात्री करून घेणं गरजेचं आहे. ‘एका क्लिकवर पाहा राम मंदिर सोहळा लाईव्ह’ असा बनावट मेसेज येण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, MHA सायबर विंगने एक अलर्ट जरी केला असून, सायबर विभागाला तशा फेक लिंकची माहिती मिळाली आहे. यामध्ये गुन्हेगार चुना लावण्यासाठी WhatsApp वर फेक लिंक पाठवत आहे.

मोबाईल हॅक होण्याचा धोका
राम मंदिर सोहळ्याची लाईव्ह स्ट्रीमिंग बघण्यासाठी बनावट लिंकवर क्लिक केल्यांनतर त्या मोबाईलमधील सेन्सेटिव्ह डेटा चोरी होऊ शकतो. तसेच बँक अकाऊंवरील पैसे सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.