बापरे कब्रस्थानातून बाळाचा मृतदेह लांबविला, पित्याचा आक्रोश

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरात असलेल्या अजिंठा चौकातील मोठ्या मुस्लीम कब्रस्तानात पुरलेल्या नवजात बाळाचा मृतदेह लांबवल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  शेख करीम यांच्या कुटुंबीयांनी नवजात बाळाचा मृतदेह शनिवार दि. ३० रोजी या कब्रस्थानात पुरला हेाता. आज सकाळी करीम शेख हे कुटुंबासह कब्रस्तानात धार्मिक विधीसाठी गेले असता त्यांना अवघ्या अठरा तासांपूर्वी अंत्यविधी केलेली तीन फूट कबर उकरलेली दिसल्यावर त्यांना प्रचंड धक्का बसला.

दरम्यान मोकाट कुत्र्यांनी कबर उकरून हा मृतदेह लांबवल्याचा संशय आल्याने मयत मुलाचे पिता शेख करीम यांनी पोलिसांत धाव घेतली.  त्यांनी  थेट एमआयडीसी पोलिस ठाणे गाठत मृतदेहाचा शोध घेऊन दोषींवर कारवाई होण्यासाठी तक्रार देण्यास विनंती केली. तक्रारी अर्ज घेतल्यावर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यावर पुन्हा कबर उकरली.  मात्र त्यात कुठेही कफन, रक्ताचे डाग असे काहीच आढळून आले नाही.

मृत बाळाचे वडील  करीम शेख ताज मोहम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्म प्रथेनुसार आम्ही आज सकाळी कबरीवर वाहण्यासाठी फुलं आणि पाणी घेवुन प्रार्थनेसाठी पोचलो. तेव्हा दफन केलेल्या बाळाची कबर उकरून त्यातील मृतदेह कुणीतरी लंबवल्याचे लक्षात आल्याने आम्ही तत्काळ कब्रस्तान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना फोन केला. त्यांचाही काही प्रतिसाद आला नाही. कब्रस्तानातील सेवेकरी शब्बीर शहा आणि अनिस शहा यांनी कुत्र्यांनी मृतदेह लांबवल्याची शक्यता असल्याचे सांगितले. म्हणून माझ्या मुलाच्या मृतदेहाचा शोध घेवुन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.