एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

वावडदा, ता.जि. जळगाव येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘द नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जळगाव’ व शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या अगोदर द नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेकडून चिन्हांकित आलेख देण्यात आलेला होता. या आलेखाच्या वाचनावरून निष्कर्ष काढून वाचन असक्षम विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यासाठी सी. डी. पाटील, श्री एस. एम. खंबायत, विजय गिरणारे, राजेंद्र खोरखेडे तसेच विटनेर हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत गरुड सर, शाळेच्या प्राचार्या जयश्री पाटील, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सुजिता साळुंखे यांची उपस्थिती होती. तसेच नेत्र तपासणी करिता डॉक्टर सुनील चौधरी यांची तीन सदस्यांची टीम उपस्थित होती.

सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये डोळ्यांची निगा कशी राखावी व दीर्घकाळापर्यंत आपली दृष्टी सक्षम कशी ठेवावी यावर मार्गदर्शन केले. आलेल्या तज्ञ डॉक्टरांनी आपल्या मशीन द्वारे विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली यामध्ये जवळपास 106 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली, ज्या विद्यार्थ्यांना पुढील तपासणीची गरज असल्याने त्यांना जळगाव येथे दवाखान्यात बोलवण्यात आलेले आहे. असोसिएशन कडून जळगाव येथे बोलविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना मोफत चष्म्याचे वाटप केले जाणार आहे.

सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या प्राचार्या जयश्री पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, तर शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.