जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी ‘सिक्युरिटी गार्डस’ ना फ्रेंडशिप बेल्ट्स बांधून केला फ्रेंडशिप डे साजरा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात सोमवार ता. ७ रोजी विध्यार्थ्यातर्फे ‘सिक्युरिटी गार्डस’ ना फ्रेंडशिप बेल्ट्स बांधून फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला. वर्षभर आपले व आपल्या वाहनांचा सांभाळ करणाऱ्या सिक्युरिटी गार्डसबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम जी. एच. रायसोनी महाविद्यालयात राबविण्यात आला. यानिमित्ताने गार्डला मित्र लाभले तसेच त्यांनाही यापासून आनंद मिळाला. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सुरक्षा रक्षक असणे हे सर्वोत्तम काम आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी, घटना रोखण्यासाठी आणि स्थिरता राखण्यासाठी सुरक्षा रक्षकाची सतर्क नजर पुरेशी असते, असे सांगत विध्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. यानंतर रेडीओ ऑरेजचे आर जे आरव हे यावेळी उपस्थित होते. त्याच्यासोबत विध्यार्थ्यानी उत्साहात गप्पा मारत मोठा जल्लोष केला, तसेच यावेळी रायसोनी महाविद्यालयातील डान्स क्लब व म्युझिक क्लब च्या विध्यार्थ्यानी विविध गीते व नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकलीत या उपक्रमाला अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी हे उपस्थित होते. तर प्रा. श्रिया कोगटा यांनी संपूर्ण उपक्रमाचे समन्वय साधले तसेच सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.