सनरायझर्स हैदराबाद मधून ब्रायन लाराला वगळले !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद (Hyderabad) ही फ्रँचायझी टीम यांच्या नव्या कोचसोबत खेळणार आहे. वेस्ट इंडिजचा अनुभवी खेळाडू ब्रायन लाराच्या (Brian Lara) प्रशिक्षणाखाली संघाची कामगिरी पर्यंत निराशाजनक होती. आज ब्रायन लाराला संघातून वेगळा करण्यात आल असून, नवीन कोचच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू डॅनियल व्हिटोरी (Daniel Vettori) यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा गेल्या मोसमापर्यंत हि जबाबदारी पार पडत होता. संघ व्यवस्थापनाच्या वतीने सोमवारी सोशल मीडियावर त्यांचे आभार मानले आहे. २०२३ मध्ये सनरायझर्स संघाने १४ पैकी १० सामने गमावले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.