सॅटर्डे क्लब जळगावतर्फे शनिवारी मोफत व्याख्यान

0

जळगाव:;– सॕटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट जळगाव चॕप्टर तर्फे शनिवारी सायंकाळी 7.30 वाजता शाहू नगरजवळील धैर्यम् प्युअर व्हेज रेस्टाॕरंटच्या सभागृहात “चॕट जीपीटी चा आपल्या व्यवसायावर होणारा परिणाम” या विषयावर मोफत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
आपला व्यवसाय कसा वाढवावा, व्यवसायातील ग्राहकांशी संवाद कसा साधावा, विपणन समस्यांचे कसे समाधान करता येईल यावर धुळे येथील सिद्धेश इन्फोटेकचे संचालक संतोष बिरारी मार्गदर्शन करणार आहेत.

व्यवसायातील मार्केटिंग, ब्रॕन्डींग, वेबसाईट, बुकींग, पेमेंट, व्यवसायातील सुधारणा, ग्राहकांना विशेष प्रस्ताव देणे तसेच विक्री व सेवा प्रशिक्षण या सर्व बाबींवर मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून तरी जास्तीत जास्त उद्योग व्यावसायिकांसह नागरीकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन क्लबचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.