जळगावात वन्यप्राण्यांवर उपचारासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर करण्यास मंजुरी

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

शासनाने जळगावात वन्यप्राण्यांवरउपचार करण्याकरिता ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर सुरू करण्यास मंजुरी दिली असून यासाठी ८ कोटी ८३ लाखांच्या निधी मंजूर झाला असून यातून हे उपचार केंद्र होणार आहे. . जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प होत असून, जागतिक वन दिनानिमित्त जिल्ह्यासाठी ही मोठी पर्वणी मानली जात आहे.

अन्नाच्या शोधार्थ वन्यप्राणी मानव वस्तीमध्ये येतात. त्यांना यामुळे धोका निर्माण झाला असून त्यांच्यावर उपचाराची पुरेशीओ सुविधा उपलब्ध होत नव्हती . मात्र आता यामुळे हि सुविधा आता उपलब्ध होणार आहे. पालकमंत्री पाटील व आमदार राजूमामा भोळे यांच्या निर्देशानुसार उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांनी वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी जळगाव येथे ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (वन्यप्राणी उपचार केंद्र) होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.

लांडोरखोरी वनक्षेत्रात उपचारकेंद्र

जळगाव वन विभागाने जळगाव शहरालगत असलेल्या लांडोरखोरी वनक्षेत्रात सुमारे १ हेक्टर क्षेत्रावर ८ कोटी ८३ लाख रुपये निधीतून ट्रांजिट ट्रिटमेंट सेंटर वन्यप्राणी उपचार केंद्र सुरू करण्यासंबंधी प्रस्ताव सादर केला. त्यास मान्यता मिळाली आहे.
वाढती लोकसंख्या, जमिनीचा वापर करण्याची बदललेल्या पद्धतीमुळे वन्यप्राण्यांसाठी वनक्षेत्र अपुरे पडत असून, मानवी वस्तीत त्यांचा वावर वाढल्याने अपघाताने जखमी होण्याचा धोका अधिक आहे. त्यासाठी जखमी वन्य प्राण्यांसाठी हे उपचार केंद्र वरदान ठरणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

या मिळणार सुविधा
उपचार केंद्रात वन्यप्राण्यांना विहित कालावधीसाठी उपचारार्थ ठेवण्यात येणार असून, ते नागरिकांना प्रदर्शनासाठी खुले करता येणार नाही. वन्यप्राणी उपचार केंद्राचे पायाभूत सुविधा स्थापित केल्यानंतर सुयोग्य यंत्रणेमार्फत योग्य प्रणालीचा वापर करून उपचार केंद्राचे दैनंदिन प्रशासन व्यवस्थापन करण्यात येणार आहे. ८ कोटी ८३ लक्ष निधीतून १ हेक्टर क्षेत्रावर वन्यप्राणी उपचार केंद्र उभारण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.