पिकांवर फवारणी करताना महिलेचा विषबाधेने उपचारादरम्यान मृत्यू

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील केळी पिकावर फवारणी करत असताना विषारी औषध डोळ्यात व अंगावर पडल्याने विषबाधा झाली होती. दरम्यान उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत १७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जिजाबाई विश्वनाथ सोनवणे (वय-५५, रा.नंदगाव ता. जि. जळगाव) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील नांदगाव येथे जिजाबाई सोनवणे या २ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान त्यांच्या नांदगाव शिवारातील शेतात केळीच्या पिकावर विषारी अळीनाशक औषधाचे फवारणी करत असताना फवारणीचे औषध त्यांच्या डोळ्यात व अंगावर त्यांना विषबाधा झाली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचार घेत असताना शुक्रवारी १७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.